Pune Karve Nagar Crime | महिलेसोबत वाद घालून अश्लील शिवीगाळ, कर्वेनगर भागातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Karve Nagar Crime | दुकानासमोर ठेवलेल्या झाडाच्या कुंड्या व इतर साहित्य काढून घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) करुन मारहाण केली. तसेच महिलेच्या दुकानात शिरुन धमकी दिल्याचा प्रकार कर्वेनगर येथे घडला आहे. हा प्रकार 20 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत 32 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अमित सुर्यवंशी, शुभम पवार व दोन महिलांवर आयपीसी 354, 509, 452, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपींनी दुकानासमोर ठेवलेल्या कुंड्या व इतर साहित्य काढून घेण्याबाबत महिलेने सांगितले. यावरुन आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घालून हाताने मारहाण केली. तसेच फिर्य़ादी यांना अश्लील स्पर्श करुन विनयभंग (Molestation Case) केला. यानंतर आरोपींनी महिलेच्या दुकानात शिरुन शिवीगाळ करुन धमकी देऊन लोकांसमोर अपमानीत केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

महिलेचा पाठलाग करुन विनयभंग

पुणे : महिलेकडे एकटक बघून तिचा पाठलाग केला. तसेच महिलेचा मोबाईल नंबर मिळवून
मेसेज करुन विनयभंग केला. हा प्रकार 15 फेब्रुवारी पासून 23 मार्च या कालावधीत भवानी पेठेत वारंवार घडला आहे. याप्रकरणी पीडित 32 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन टेम्पो चालक संतोष लोंढे (वय-38 रा. काशेवाडी, भवानी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”