Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत 28 लाख जप्त, भरारी पथकाची कारवाई

कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

 

पुणे: पोलीसनामा ऑनलाई – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने 13 हजार 542 वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये 28 लाख 18 हजार 500 इतकी रक्कम ताब्यात (Cash Seized) घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

दरम्यान, चिंचवडच्या (Pune Chinchwad Bypoll Election) दळवीनगर भागात शुक्रवारी (दि. 24) चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी (SST) पथकाला एका वाहनातून सुमारे 14 लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड आढळून आली आहे.
पुढील तपासासाठी ही संशयित रक्कम आयकर विभागाकडे (Income Tax Department) सुपूर्द करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार आढळून आला. (Pune Chinchwad Bypoll Election)

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | In Kasba Peth Constituency, 28 lakh rupees have been seized from the Bharari team so far

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | बुधवारी डेक्कन, कोथरुड भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Crime News | ससुन हॉस्पिटलमध्ये शिकलकरी टोळ्यांमध्ये राडा, एक जण ताब्यात

Vh1 Supersonic | भारताचा स्वतःचा बहु-शैली संगीत आणि जीवनशैली महोत्सव, व्हीएच1सुपरसॉनिक, पुण्यात

Sambhajinagar | औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! केंद्र सरकारची मंजुरी; देवेंद्र फडणवीसांनी केलं ‘हे’ ट्विट

Pune Police News | पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तात हलगर्जीपणा करणे महागात पडलं ! पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी घेतलं ‘फैलावर’; 30 पोलिसांना दिली एकाच वेळी ही शिक्षा, ‘डिपार्टमेंट’मध्ये खळबळ