Sambhajinagar | औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! केंद्र सरकारची मंजुरी; देवेंद्र फडणवीसांनी केलं ‘हे’ ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhajinagar | औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराला राज्य सरकारनं मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) तर उस्मानाबादचे नाव धाराशिव (Dharashiva) असे असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah) यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘करुन दाखविले’ असेही फडणवीस यांनी म्हणाले.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावावरुन मागील काही वर्षे राज्यात राजकारण (Maharashtra Politics) सुरु होते. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादला संभाजीनगर (Sambhajinagar) असे नाव देण्याची मागणी केली होती. यानंतर शिवसेनेकडून औरंगाबादला संभाजीनगर असे म्हटले जात होते. तर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जात होता. हिंदुत्ववादी संघटनांनी या दोन शहरांच्या नामंतराची मागणी केली होती.

 

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळाने 29 जुलै 2022 रोजी औरंगाबातचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, त्यानंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे -फडणवीस यांचे सरकार आले.
या सरकारने 14 जुलै 2022 रोजी महाविकास आघाडीने केलेला नामांतराचा ठराव रद्द केला.
यानंतर 16 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.
आता शुक्रवारी (दि.23 फेब्रुवारी 2023) केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि
उस्मानाबदचं नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.

 

Web Title :- Sambhajinagar | sambhajinagar centres green light for name change of aurangabad and osmanabad devendra fadnavis twit this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त, परिसरात खळबळ

Onkar Bhojane | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बड्या चित्रपटांची ऑफर

Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21 मार्चपर्यंत स्थगिती