Pune Water Supply | बुधवारी डेक्कन, कोथरुड भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून एसएनडीटी (M.L.R.) परिसरात फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या बुधवारी (1 मार्च) करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी डेक्कन, कोथरुड, कर्वेनगरसह इतर भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद राहणार आहे.

 

तर गुरुवारी (2 मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली.

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
SNDT (M.L.R) – प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, कर्वे रोड, एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटी, मयूर कॉलनी,
डेक्कन परिसर, कोथरूड, संगम प्रेस रोड, करिष्मा सोसायटी, हॅपी कॉलनी, सहवास सोसायटी, कर्वेनगर परिसर,
म्हात्रे पूल ते राजाराम पूल, श्रीमान सोसायटी परिसर, मनमोहन सोसायटी, कर्वे पुतळा परिसर, आयडियल कॉलनी परिसर,
पौड रोड, भांडारकर रोड, एसएनडीटी परिसर या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to Deccan, Kothrud areas will be shut on Wednesday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त, परिसरात खळबळ

Onkar Bhojane | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बड्या चित्रपटांची ऑफर

Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21 मार्चपर्यंत स्थगिती