Pune Kasba Peth Bypoll Election | महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ; रासने म्हणाले – ‘हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा’

पुणे : Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते ओमकारेश्‍वर मंदिर परिसरात झाला. त्यानंतर शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. (Pune Kasba Peth Bypoll Election)

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Nana Bhangire), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष भरत लगड, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, चिटणीस धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, प्रदेश प्रवक्ता कुणाल टिळक, गौरव बापट, शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, माजी नगरसेवक गायत्री खडके, अजय खेडेकर, योगेश समेळ, आरती कोंढरे, कसबा भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे, राणी सोनावणे, राजेंद्र काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Pune Kasba Peth Bypoll Election)

सुरेश मुनगंटीवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

१९७८ सालापासून एखाद-दुसरा अपवाद वगळला तर कसबा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे. सत्य, धर्म, देश, विकासासाठी काम करणार्‍या विचारांचा विजय झाला आहे. विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी आहे. हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे. केंद्र आणि राज्यात भाजप आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सरकार आहे. कसब्यातील मतदारांना आवाहन आहे जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्‍या भाजपला विजयी करा. हेमंत रासने कसब्याचे आणि पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील याची ग्वाही मी देतो. कसब्यातील मतदारांना सुवर्णसंधी आहे, भाजपची विजयाची परंपरा पुढे न्यावी. २०२४ च्या विधानसभा लढाईचा हा शुभारंभ असेल असा विश्‍वास वाटतो.

हेमंत रासने यांच्या भाषणातील मुद्दे – आजपासून आमचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार,
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ आम्ही करत आहोत.
हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीत विजय १०० टक्के निश्‍चित आम्हाला कधीच कोणाची भीती वाटत नाही.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते त्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही घर आणि घर पिंजून काढणार आहोत.
आम्ही केलेल्या विकासाचा अजेंडा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi),
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात, राज्यात आणि शहरात विकास करीत आहोत.
पुढील ५० वर्षांतील पुणे शहर हे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे.
या स्वप्नाला पुणेकरांची साथ आहे आणि आम्ही ते पूर्ण करू हा मला विश्‍वास आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Mahayuti candidate Hemant Rasane’s campaign launch; Rasane said – ‘This start will lead to a record victory’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शोळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त

Amruta Khanvilkar | केवळ चार शब्दातच अभिनेत्री अमृता खानविलकरने केले ट्रॉलर्सचे तोंड बंद; व्हिडिओ व्हायरल

Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…