Pune Kasba Peth Bypoll Election | खासदार गिरीश बापट यांची पोटनिवडणूक प्रचारातून माघार; भाजप नेत्यांची पाठींब्यासाठी मनसे व अन्य छोट्या पक्षांकडे पळापळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारातून भाजपचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे. आजारपणाच्या कारणास्तव मी घरोघरी जाऊन प्रचार करु शकत नाही, असं पत्रक काढून प्रचारादरम्यान आपला सक्रिय सहभाग नसल्याचं बापटांनी कळवलं आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

कसब्यात भाजप (BJP) महायुती विरुद्ध कॉंग्रेस (Congress) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी थेट लढत होत आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी मिळेल, अशी भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसोबतच विरोधी पक्षाची देखिल धारणा असताना भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली. रासने यांच्या उमेदवारीची घोषणा करताना ही निवडणुक खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा भाजप नेत्यांनी केली. परंतू ही घोषणा करत असताना बापट हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. प्रकृतीच्या कारणास्तव ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही गैरहजर राहीले होते. यानंतरही बापट यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने पुण्यामध्ये बापटच भाजपचे ताकदवर नेते असल्याचे भाजपातील नेत्यांना मान्य करावे लागले. आता बापटच प्रचारात नसल्याने मात्र, भाजपच्या नेत्यांची मनसेसह अन्य पक्षांच्या मदतीसाठी पळापळ करावी लागत आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर झाली आहे. गेले ३ महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूप कमी काम केले असून तरी सुद्धा मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही, असं सांगून गिरीश बापटांनी प्रचारातून माघार घेतली आहे.

मी इथे बसलोय, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करत विजयाची ग्वाही गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत दिली होती. मात्र आठवड्याभरातच गिरीश बापटांच्या प्रचारातून माघारीने भाजपला कमी-अधिक प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करतायेत.

 

पाठींब्याच्या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
मनसेने काल कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठींबा दिला आहे.
तर भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेशी युती फक्त कसबा मतदार संघापुरती असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येउ लागल्या आहेत.
कार्यकर्ते आणि मनसेला माननारा मतदार हा केवळ ‘यूज ऍन्ड थ्रो’ सारखा आहे असा संदेश यातून जात आहे.
२०१२ च्या महापालिका निवडणुकीमध्ये मनसेच्या जागांवरच भाजपचे नगरसेवक निवडूण आले आहेत.
आगामी निवडणुकीतही महायुती, महाविकास आघाडीसोबतच मनसेचा सामना होणार आहे.
त्या निवडणुकीत भाजपचे नेते त्यांच्या उमेदवारांविरोधात आम्हाला पाठींबा देणार आहेत?
मनसेेचे स्थानीक नेते असे निर्णय घेउन कार्यकर्त्यांचे राजकिय करियर उध्वस्त करत असून पक्षाचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray)
यांच्या प्रतिमेलाही तडे देत असल्याचे मनसेचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | MP Girish Bapat withdraws from by-election campaign; BJP leaders run to MNS and other small parties for support

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचं टेन्शन वाढलं? ‘किंगमेकर’ ची प्रचारातून माघार

Pune Accident News | पुणे-नगर रोडवर डॉक्टर दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, महिला डॉक्टरचा मृत्यू