Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणूक : देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, कसब्यात रवींद्र? काँग्रेसची घोषणा अन् भाजपच्या गोटात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. याठिकाणी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मध्ये थेट लढत होणार आहे. कसब्याची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या (Congress) वाट्याला गेली आहे. काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कसब्यात रवींद्र अशी घोषणाबाजी करण्यात आली. सध्या या घोषणेची कसब्यात (Pune Kasba Peth Bypoll Election) चर्चा रंगू लागली आहे.

 

काँग्रेसने केलेल्या या घोषणेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. देशात आणि राज्यात विकासाचे काम (Development Work) सुरु आहे, हे विरोधकांनी मान्य केले आहे. त्यामुळेच विरोधकांना भाजप नेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे. भाजपच्या विकासाची भूमिका विरोधकांनी मान्य केली आहे, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दोन्ही बाजूंनी अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक (Star Campaigner) प्रचारात उतरणार असल्याने प्रचारातील रंगत अधिक वाढणार आहे. यातच विरोधकांनी दिलेल्या नव्या घोषणेमुळे कसब्यातील निवडणकू अधिकच रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.

 

रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी नाराज शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची भेट घेतली.
त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कसब्यात रवींद्र अशी घोषणाबाजी करण्यात आली.
या दोन्ही घटना भाजपच्या चांगल्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांना यावर भाष्य करावे लागले.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | ravindra in kasba announcement of congress create disturbance in bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या