Pune Kasba Peth Bypoll Election | रविंद्र धंगेकर यांच्या पाठीशी उभे रहा, शरद पवारांचे खेळाडूंना आवाहन

NCP Chief Sharad Pawar | sharad pawar on patangrao kadam and cyrus poonawalla adar poonawalla
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | बालेवाडी येथील जागेवर स्टेडियम (Balewadi Stadium) उभारणीची मुहुर्तमेढ 1994 साली रोवली. त्या ठिकाणाहून येता जाता अस्वस्थ होते. ऐवढे मोठे स्टेडियम असूनही सर्वसामान्य घरातील खेळाडूला सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. अर्थकारण मोठे झाले असून ही परिस्थिती बदलणे गरजेची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी खेळाडूंशी (Players) चर्चा करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पाठीशी उभे राहा (Pune Kasba Peth Bypoll Election) असे आवाहनही त्यांनी केले.

 

ते पुढे म्हणाले, क्रिकेटपटुंसह इतर खेळातील खेळाडूंसाठी पेन्शन योजना सरकारच्या माध्यमातून सुरु केली. अनेक खेळाडू मोठे होताना पाहिले असून खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ खेळाडूंच्या मेळावा आणि सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार रविंद्र धंगेकर, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण (MP Adv. Vandana Chavan), अंकुश काकडे (Ankush Kakade), अ‍ॅड. अभय छाजेड, रोहित टिळक (Rohit Tilak), राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap), दिपक मानकर, काका पवार, यांसह शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, म्हाळुंगे-बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल उभारण्यात आले. कालांतराने स्टेडियममध्ये अर्थकारण शिरल्याने सर्वसामान्य खेळाडू या सुविधांपासून वंचित राहत आहे.

 

याप्रसंगी वसंत बोर्डे-सातव, रोलर स्केटिंग पटू वैदेही सरोदे, मल्लखांबपटु सत्यजित शिंदे,
अर्जुनवीर शांताराम जाधव, अर्जुनवीर श्रीरंग इनामदार, दिपक मानकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविक अ‍ॅड. अभय छाजेड यांनी केले.
सूत्रसंचालन शिल्पा भोसले यांनी तर शांतीलाल सुरतवाला यांनी आभार मानले.

 

 

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Stand by Ravindra Dhangekar, Sharad Pawar appeals to players

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Peth Bypoll Election | ओबीसींच्या प्रश्नानाकडे भाजपचे दुर्लक्ष – विजय वडेट्टीवार

Hera Pheri 3 |अखेर पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी राजू, शामसोबत बाबू भैय्या सज्ज; ‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला झाली सुरुवात

Pune PMC News | सिद्धार्थ नगर मधील रहिवाशांना मिळणार पक्की घरे – जगदीश मुळीक

Raigad Crime News | धक्कादायक ! दागिन्यांसाठी चोरटयांनी केली वृद्ध महिलेची हत्या

Pune Crime News | पोलीस वसाहतीमधून पोलिसाची दुचाकी चोरीला, पोलीस वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)