Pune Kasba Peth Bypoll Election | ‘कसब्यातील जनतेचा आमच्यावर विश्वास’; भाजपचा दावा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) प्रतिष्ठेची केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही राजकीय पक्षांचे दिग्गज नेते मागील काही दिवसांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. अखेरच्या दिवशी मतदारांना (Pune Kasba Peth Bypoll Election) आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.

कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला असून महाविकास आघाडीने याठिकाणी उमेदवार उभा केल्याने ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. कसब्याची जागा जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपचे बडे नेते मतदारसंघात प्रचार फेरी, रॅली, रोड शो च्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार हल्लाबोल केला. तसेच या निवडणुकीत हेमंत रासने (Hemant Rasane) शंभर टक्के विजयी होतील, कसब्यातील जनतेचा आमच्यावर विश्वास असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या डबल इंजीन असलेल्या सरकारकडून कसब्यात जेवढ्या पेठा आहेत त्या पेठांचा पुनर्विकास करण्याची योजना या सरकारने केली आहे. हेमंत रासने निवडून आले तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आणि गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या मार्गदर्शनाखाली कसब्याचा जो विकास थांबला आहे तो करतील अशी अपेक्षा जनतेला आहे असे त्यांनी सांगितले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

हिंदूच्या विरोधी चर्चा आम्ही केली नाही

शरद पवारांवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या सभेला एका नेत्याने जेवढी लोकं बाहेर गेली असतील त्या सर्वांना बोलवा.
सर्वांकडून मतदान करुन घ्या. ज्यांचा मृत्यू झाला त्यांनाही हजर करा आणि मतदान करा.
ही हिंदुत्ववादी विरोधी भूमिका शरद पवार यांच्या सभेतून झाली.
मुस्लिम समाजाचे नाव घेऊन हिंदूंच्या विरोधी चर्चा आम्ही कधीच केली नाही, मात्र शरद पवारांकडून हे
अपेक्षित नव्हते त्यांनी थांबवायला पाहिजे होतं, आम्ही कधी ही हिंदुत्ववादी विरुद्ध इतर असा चेहरा कधी ही
तयार केला नाही, त्यामुळे एक ही ब्राह्मण मतदार नाराज नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Voters in Kasba Trust On BJP Says State President Chandrasekhar Bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त