Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा व चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवारच जिंकणार, गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर साधला निशाणा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी येत्या रविवारी (दि.26) मतदान होत आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचाराला काही तास शिल्लक राहिले असून दोन्ही ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. भाजपच्या (BJP) उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या प्रचारात उतरवले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे गुरुवारी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या प्रकारने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला.

गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय असून ते प्रसिद्धीसाठी शरद पवारांवर टीका करत असतात त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. अशा शब्दात रोहित पवारांनी पडळकरांवर टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी रोहित पवार हे बिनडोक असून त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) बोटे घालण्याची सवय असल्याचा टोला लगावला.
MPSC तरुणांच्या आंदोलनाचे (MPSC Youth Agitation) श्रेय शरद पवारांना घेयचे आहे म्हणून ते बैठक
घडवून आणत आहेत. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सोडवत असल्याचे पडळकरांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर रोहित पवारांवर टीका करताना पुढे म्हणाले, मेंढराच्या डागनीने डागल तर ते सुधारणार नाहीत.
खुरप्याने डागावे लागेल. मग कुठेतही त्यांना अक्कल येईल.
शरद पवारांवर टीका करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री MPSC च्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे आहेत.
मात्र शरद पवार यांनी त्याठिकाणी जाऊन तरुणांची भेट घेतली.
त्यांना श्रेय घ्यायच असल्याने त्यांची बैठक घडवून आणत आहेत. त्यांना लुडबुड करण्याची गरज नाही.
त्यांना केवळ राजकारण करायचे असून प्रश्नांची सोडवणूक करायची नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | gopichand padalkar criticizes sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप प्रचंड बहुमतांनी जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Thane Crime News | ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिली म्हणून तरुणांवर गुन्हा दाखल, ठाण्यातील घटना