Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result | कसब्यात रवींद्र धंगेकर यांची निर्णायक आघाडी, तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result) मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झाली. कसब्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या थेट लढत होत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये भाजपकडून (BJP) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), मविआचे नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत भाजप-काँग्रेस- राष्ट्रवादी (NCP) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

कसबा निवडणुकीत आतापर्यंत 16 फेऱ्या पार पडल्या असून रवींद्र धंगेकर यांना 60 हजार 657 मते तर भाजपचे हेमंत रासने यांना 53 हजार 230 मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून सातत्याने आघाडीवर असून या 16 फेरी अखेर धंगेकर यांनी 6 हजार 957 मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)

 

धंगेकर यांनी आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्य़कर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

 

Web Title :- Pune Kasba Petth Chinchwad Bypoll Election Result | Ravindra Dhanekar’s
decisive front in Kasaba, while Ashwini Jagtap leads in Chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा