Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणात जागा मालकासह 4 जणांवर FIR, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | पुण्यातील कात्रज (Katraj, Pune) परिसर काल सायंकाळी सिलेंडरच्या स्फोटांनी हादरुन गेला. तब्बल 22 सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणात (Pune Katraj LPG Gas Cylinder Blast) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) जागा मालकासह 4 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे.
धक्कादायक म्हणजे याठिकाणी अनधिकृतरित्या (Unauthorized) सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
141 लहान तर 26 मोठे सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.
ही घटना कात्रज येथील अंजलीनगर येथील सुधामाता मंदिराच्या पाठीमागे पाचच्या सुमारास घडली.

 

सागर संदीप पाटील Sagar Sandeep Patil (रा. सुधामाता मंदिराच्या पाठीमागे, अंजलीनगर, कात्रज), सोनु मांगडे (Sonu Mangde), संपत सावंत (Sampat Sawant), जागा मालक दत्तात्रय काळे (Dattatraya Kale) यांच्यावर भादवि 285, 308, 435, 436, 336, 34, जिवनावश्यक अधिनियम 3,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक सागर पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश खंडू काळ Ganesh Khandu Kaal (वय-25) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Katraj LPG Gas Cylinder Blast)

 

मंगळवारी सायंकाळी कात्रज येथील सुधामाता मंदिर परिसरात एका पाठोपाठ 22 सिलेंडरचा स्फोट झाले.
सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला (Gas Refilling) जात असताना हे स्फोट झाले.
या स्फोटाच्या आवाजाने परिसरात आगीच्या ज्वाळा उसळत होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर 8 गाड्यांद्वारे आग आटोक्यात आणली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Inspector of Police Jagannath Kalaskar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधामाता मंदिर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या सिलिंडरमधून छोट्या पाच किलोच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम अवैधपणे सुरु होते.
पण सिलेंडर भरत असताना अचानक सिलिंडरमधून गॅस गळती होऊ लागली.
गॅस गळतीमुळेच हे स्फोट झाले असण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरुन 16 रिकामे आणि आठ भरलेले मोठे सिलिंडर जप्त केले आहेत.

 

या घटनेत गोडावून, दोन चारचाकी वाहने जळाली आहेत.
हे स्फोट एवढे भयंकर होते की तेथून काही अंतरावर असलेल्या एका घरावरील पाण्याची टाकी फुटलेल्या सिलिंडरचा तुकडा लागल्याने फुटली.
स्फोटांच्या आवाजाने एका घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या.
स्फोटांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील मुलांमध्ये घबराहट पसरली होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | FIR against 4 persons including landlord in Katraj cylinder blast case one arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा