Pune Katraj Zoological Park | पुण्याच्या कात्रज प्राणिसंग्रहालयातील ‘प्रियदर्शनी’ वाघिणीनेन घेतला अखेरचा श्वास 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj Zoological Park | कात्रज येथील राजीव गांधी संग्रहालयातील (Pune Katraj Rajiv Gandhi Zoological Park) 21 वर्षीय पट्टेरी प्रियदर्शनी वाघिणीचे (priyadarshini tiger) शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

प्राणी संग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रियदर्शनी गेल्या तीन-चार दिवसांपासून आजारी होती.  तिचे खाणे पिणे देखील कमी झाले होते. मागील पाच वर्षांपासून वार्धक्यामुळे तिला व्यवस्थित चालता येत नव्हते तसेच तिच्या अंगाला जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे तिला पर्यटकांना देखील दाखवण्यात येत नव्हते. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्राणी संग्रहालयात 4 वाघ आणि 3 वाघिणी असून औरंगाबादहून आलेली ‘अर्जुन’ आणि ‘भक्ती’ची जोडी देखील प्राणी संग्रहालयात दाखल झाली आहे.
त्याचबरोबर रिद्धी, गुरु, आकाश आणि तानाजी असे  पिवेळे पट्टेरी वाघ असून राजकोटवरून आणलेल्या पांढऱ्या पट्टेरी वाघिणीचे नाव अजून ठेवण्यात आलेले नाही. (Rajiv Gandhi Zoological Park)

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव म्हणाले की,
सर्वसाधरण 16 ते 18 वर्ष वाघांचे वय असते. एक ते दोन महिने प्रियदर्शनी जगेल अशी आशा आम्हाला होती.
परंतु, तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आता प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या आता आठवरून सात झाली आहे.

Web Title :-  priyadarshini tiger passed away in Rajiv Gandhi Zoological Park katraj pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Police | पुण्यात पोलीस भरती परिक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 2744 हजार जणांचा फौजफाटा तैनात

Pune Crime | सलूनमध्ये ‘दाढी’ करणं तरुणाला पडलं दोन लाखात, पुण्यातील धक्कादायक प्रकार