Pune Police | पुण्यात पोलीस भरती परिक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 2744 हजार जणांचा फौजफाटा तैनात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police) रिक्त 214 शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा (Pune Police) होणार आहे. पुण्यातील 79 परीक्षा केंद्रावर पोलीस शिपाई पदासाठीची परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल 2744 पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा (personnel) फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिली.

पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलीस शिपाई पदासाठी (Pune Police) 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. परंतु देशात आणि राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आहे. त्यानुसार 214 रिक्त जागांसाठी तब्बल 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीमध्ये (police recruitment) पहिल्यांदा लेखी परीक्षा (Written test) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाची लेखी परीक्षा जी.एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत (G.S. Software company) घेतली जात आहे.

असा आहे बंदोबस्त
अपर पोलीस आयुक्त (Additional Commissioner of Police) -2, पोलीस उपायुक्त (DCP)-8, सहायक पोलीस आयुक्त (ACP) -13, पोलीस निरीक्षक (PI) – 76, एपीआय (API) – 87, पीएसआय (PSI) 80, पोलीस कर्मचारी (police personnel)- 2 हजार 478

 

पोलिसांकडून उमेदवारांना सूचना

परीक्षेत मोबाईल वापरता येणार नाही

कोवीडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

परीक्षा झाल्यानंतर पर्यवेक्षकांच्या सूचनेनंतर जागा सोडावी.

परीक्षेला येताना हॉल तिकीटासह, आधार, पॅन, लायसन्स, पासपोर्ट जवळ बाळगावा

उमेदवारांनी निळे आणि काळ्या बॉलपेनचा वापर करावा

परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागेल.

हॉल तिकीट कसे डाऊनलोड करायचे
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर हॉल तिकीटची लिंक पाठवली जाणार आहे. काही अडचण आली तर 9699792230, 8999783728, 020-26122880 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title :- Pune Police | A large contingent of police for the police recruitment examination in Pune, an army of 2744 thousand people deployed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 3,164 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | सलूनमध्ये ‘दाढी’ करणं तरुणाला पडलं दोन लाखात, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Sangli Crime | 3 महिन्याच्या ‘डॉबरमॅन’ कुत्र्याचे दोन्ही कान कापणाऱ्या डॉ. कोल्हेंवर FIR