Pune Khadak Police | मुलीच्या उपचारासाठी काढलेल्या कर्जाच्या पैशांची सॅक विसरली रिक्षात, खडक पोलिसांनी काही तासात महिलेला मिळवून दिली सॅक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadak Police | मुलीवर उपचार करण्यासाठी दीड लाख रुपये कर्ज काढले. मात्र हवालदील झालेल्या महिलेची सॅक खडक पोलिसांनी काही तासात परत मिळवून दिली. महिलेची सॅक शोधण्यासाठी खडक पोलिसांनी सुमारे 70 सीसीटीव्ही तपासले. पैशांची सॅक परत मिळाल्याने महिलेने खडक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. खडक पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Pune Khadak Police)

एलिझाबेथ रवी (वय 45 रा. भवानी पेठ) यांच्या मुलीला 12 ऑक्टोबर रोजी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. हॉस्पिटलमधून घरी येत असताना त्यांच्याकडे असलेली सॅक रिक्षात विसरल्या. या सॅकमध्ये एक लॅपटॉप आणि मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे दीड लाख रुपये होते. रिक्षात सॅक विसरल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने गस्तीवर असलेल्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना याबाबत सांगितले. विशेष म्हणजे एलिझाबेथ यांनी मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. आणि तिच रक्कम रिक्षात विसरली. (Pune Khadak Police)

मुलीच्या शस्त्रक्रियेची रक्कम असलेली सॅक रिक्षात विसरल्याने एलिझाबेथ रवी हवालदिल झाल्या होत्या. महिलेवर ओढावलेला प्रसंग पाहून खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने (Sr PI Sunil Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राऊत, सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या सुचनेनुसार तपास पथकातील आशिष चव्हाण, अक्षय वाबळे, सागर कुडले, तळेकर व इतर कर्मचाऱ्यांनी तब्बल 70 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिक्षाचा क्रमांक मिळवला. पोलिसांनी रिक्षा आणि रिक्षाचालक यांना मंगळवार पेठेतून ताब्यात घेतले. तसेच रिक्षात विसरलेली सॅक ताब्यात घेतली.

लॅपटॉप व दीड लाख रुपये असलेली सॅक सुनील माने यांच्या हस्ते एलिझाबेथ रावी
यांच्या स्वाधीन करण्यात आली. उपचारासाठी कर्ज काढून आणलेली रक्कम अचानक गहाळ झाली.
मात्र खडक पोलीसांनी ही रक्कम परत मिळवून देताना दाखवलेली संवेदनशीलता व
कौशल्य पाहून एलिझाबेथ रवी यांनी खडक व पुणे पोलिसांचे अभार मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | महापालिका आणि शिक्षणमंडळाकडील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना
1 जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन आणि पेन्शन मिळणार – रविंद्र बिनवडे

Pune PMC News | आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील युवकास महापालिकेच्या शहरी गरीब योजनेत
सहभागी करण्याासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांवर दादागिरी