Pune Khed Court News | आळंदी येथील स्फोट प्रकरणात माजी सभापतीच्या मुलाला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – Pune Khed Court News | खेड तालुक्यातील आळंदी जवळील कंपनीतील झालेल्या स्फोटातील माजी सभापतीचा मुलगा शुभम रामदास ठाकूर याला सत्र न्यायालयाकडुन जामीन मंजुर करण्यात आला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. सुधीर शाह यांनी दिली. (Pune Court News)

याबाबत माहिती अशी की, 8 फेब्रुवारी 2024 रोजी आळंदीतील स्पेसिफिक अलॉय प्रा. लि. कंपनी स्फोट झाला होता. त्यामध्ये 7 इसम मरण पावले होते व 15 इसम  जखमी झालेले होते. याबाबत आळंदी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा (रजिस्टर  23/2024) दाखल करण्यात आला आहे. आरोपी नरेंद्र मोहनलाल सुराणा,शुभम रामदास ठाकूर, फानेंद्र मुनोत यांच्यावर आयपीसी 304(2),427,34 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

सदरील कंपनी ही शुभम रामदास ठाकुर यांचे वडील. रामदास ठाकूर यांनी लिलावात खरेदी केली असुन सदर कंपनीचा सात बारा रामदास ठाकुर यांचे नावावर झाला होता. परंतु सदर कंपनी ताब्यात देणे बाबत कॅनरा बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. तरी सुद्धा शुभम ठाकुर याने वॉचमन याचेकडून जबरदस्तीने चावी घेऊन स्क्रप कटिंग करणे बाबत काम चालु केले होते. त्यामुळेच सदर कंपनीत स्फोट घडण्यास कारणीभूत झाला असावा. अशी प्राथमिक माहीती आहे.” असा युक्तिवाद अ‍ॅड. शहा यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी जमीन मंजूर केला.

आरोपीकडून  अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. जितेंद्र सावंत, अ‍ॅड. वैभव मेदनकर
अ‍ॅड. नमित खांडगे यांनी काम पाहिले. आरोपीस सत्र न्यायालय, ए. एस. सय्यद साहेब यांनी जमीन मंजूर केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! पुण्यात 144 CRPC ची ऑर्डर सुधारित ऑर्डर 31 मार्च पर्यंत लागू राहणार; जाणून घ्या नवीन नियम व अटी

Ajit Pawar On PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकीसाठी जप्तीसारख्या कारवाया करू
नयेत; पालकमंत्री अजित पवार यांचे महापालिकेला आदेश

Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त (Videos)

Editors Guild Of Pune-Pimpri | पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून सोशल मिडियाचा योग्य वापर, हरवलेली मुलगी तासाभरात आईच्या कुशीत सुखरूप

Uddhav Thackeray On BJP | भाजपाच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचारी नेत्याचं नाव, पण निष्ठावंत गडकरींना
टाळलं, उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र