Pune Lady Police Suspended | पुण्यातील महिला पोलिस तडकाफडकी निलंबित; गंभीर गुन्ह्यात ‘गुतवण्याची’ धमकी देऊन पैशांची मागणी आणि ‘पिंपरी’च्या वाकडमध्ये एकाला मारहाण, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lady Police Suspended | गंभीर गुन्ह्यात ‘गुतवण्याची’ धमकी देऊन पैशांची मागणी करुन मारहाण करणाऱ्या पुणे सायबर पोलीस ठाण्यातील (Pune Cyber Police Station) एका महिला पोलीस शिपायाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे (Pune Lady Police Suspended). लता दत्तात्रय चव्हाण (LPC Lata Dattatray Chavan) असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. लता चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale) यांनी बुधवारी (दि.2) रात्री उशीरा काढले. (Pune Lady Police Suspended)

 

लता चव्हाण या पुणे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या (EoW And Cyber Crime Branch Pune) सायबर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. चव्हाण यांनी त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या Pimpri Chinchwad Police (PCPC) कार्यक्षेत्रात वाकड (Wakad) येथील एका व्यक्तीला धमकावून क्रिप्टो करन्सीच्या (Cryptocurrency) गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Pune Crime)

 

लता चव्हाण यांनी केलेले हे वर्तन बेशिस्तीचे, गुन्हेगारी स्वरुपाचे आणि पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याने त्यांना बुधवार (दि.2) पासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. निलंबन काळात निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला निलंबन वेतन घेण्यापूर्वी निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकरची खासगी नोकरी करणार नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

तसेच मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर मुख्यालय सोडायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त, प्रशासन व पोलीस उपायुक्त मुख्यालय यांच्या परवानगीने मुख्यालय सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन काळात दररोज राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे शहर येथे हजेरी लावण्याचे आदेशात नमूद केले आहे.

Web Title :- Pune Police Crime Branch Cyber Police Station Lady Police Suspended Know In Details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dheeraj Patil Suspended | साताऱ्याचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे निलंबन; प्रचंड खळबळ

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! दोन वर्षानंतर राज्यात आज शून्य ‘कोरोना’ मृत्यूची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Lilly Summers | ऐकावं ते नवलच ! ‘पुतिन यांचे आदेश न ऐकणाऱ्या सैनिकांना मी…’; अ‍ॅडल्ट मॉडलने रशियाच्या सैनिकांना दिली विचित्र ऑफर