‘मोक्का’च्या गुन्ह्यातील फरार कुख्यात गुंड शुभम गोळेला पिस्तूलासह अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात शुभमला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शुभम संभाजी गोळे (वय 24 रा. गोळेअळी पिरंगुट ता. मुळशी जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शुभम हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, अवैधरित्या शस्त्र बाळगणे यासह एकूण 19 गुन्हे दाखल आहेत. त्यापार्श्वभूमीवर शुभमवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999कलम 3,(1)(II),3(4) नुसार (मोक्का) कारवाई करण्यात आलीे आहे. यात तो 4 वर्ष येरवडा कारागृहात होता. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. पुन्हा तो पसार झाला होता.

फरार काळात त्याच्या सांगण्यावरून पिरंगुट गावचे अनोळखी तिघांनी एका व्यक्तीस गुप्तीचा धाक दाखवून जबरदस्ततीने गाडीसह लवळे गावाकडे जाणारे टी आर डब्लू कंपनीचे शेजारी मोकळे जागेत नेले. तसेच त्यांच्या साथीदारांनी 41 हजार रुपयांचा ऐवज घेतला होता. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील या करीत असून,

गुन्हा झाल्यापासून फरार होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक त्याचा समांतर शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे शुभमला सातारा जिल्ह्यामध्ये कराड येथील हजारमाची येथे सापळा लावून शितापीने आरोपी अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली कर्मचारी अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, दत्तात्रय जगताप, राजेंद्र चदनशिव, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, विजय कांचन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, धीरज जाधव,दगडू वीरकर, समाधान नाईकनवरे पथकाने केली.