Pune Lohmarg Police | 13 वर्षापूर्वी हरवलेला मुलगा पुणे लोहमार्ग पोलिसांमुळे कुटुंबात परतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन झेलम एक्सप्रेस गाडीने (Jhelum Express) प्रवास करीत असताना मे 2008 मध्ये गणेश मुन्नुलाल यादव (वय-26) हा बेपत्ता (Missing) झाला होता. याप्रकरणी त्याचा भाऊ सुशिलकुमार मन्नुलाल यादव (वय-25 रा. मु.पो.हिनोतीया भोई ता. बरेला मध्यप्रदेश) याने लोहमार्ग पोलिसांकडे (Pune Lohmarg Police) तक्रार केली होती. या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिसांनी (Pune Lohmarg Police) बेपत्ता तरुणाचा शोध घेऊन 13 वर्षांनी त्याला कुटुंबाच्या स्वाधिन केले.

पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मनुष्य मिसींगचा तपास करत असताना
पोलिसांना गणेश यादव याची माहिती मिळाली.
गणेश यादव हा सुरत (Surat) येथील आर्सन मित्तल अँड निप्पो स्टील प्लॅन्ट कन्व्हेअर
(Arsen Mittal & Nippo Steel Plant Conveyor) या कंपनीत काम करत
असल्याची माहिती मिळाली.
लोहमार्ग पोलिसांनी गणेश यादव याला ताब्यात घेऊन गुरुवारी (दि.2) त्याच्या कुटुंबाच्या स्वाधिन केले. हरवलेला मुलगा 13 वर्षानंतर आपल्या कुटुंबात परतल्याने कुटुंबाने पुणे लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे (SP Sadanand Vayse),
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (Additional Superintendent of Police Kavita Nerkar),
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षिरसागर (Sub-Divisional Police Officer Shrikant Kshirsagar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद (Senior Inspector of Police Maula Sayyed) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार दिपक काळे,
पोलीस हवालदार गजानन केंगार, पोलीस नाईक उदय चिले, पोलीस शिपाई संजिव हासे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Lohmarg Police | The son who went missing 13 years ago has returned to his family due to Pune Railway Police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | ‘जे पालक पैसे देण्यास तयार होतील त्यांचेच अर्ज पात्र करा’ ! गट शिक्षणाधिकार्‍याने दिल्या सुचना, ACB च्या तपासातून झालं स्पष्ट

BOM Recruitment 2021 | बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे 198 जागांसाठी मोठी भरती

NCP – Shiv Sena | सेना-राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर; बीडमधील आमदार पुतण्यावर काकाचे आरोप