Pune Lok Sabha Bypoll Election | पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार कोण असेल?, बावनकुळेंची महत्त्वाची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असताना उमेदवार कोण असणार? यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी (Pune Lok Sabha Bypoll Election) सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली असताना भाजपकडून तीन नावांची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

पुण्यातील भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट कुटुंबीय अद्याप दु:खातून सावरलेलं नाही. त्यामुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही अफवा पसरवू नका. तुर्तास मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही, असं सांगत बावनकुळे यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याचं उत्तर सध्यातरी गुलदस्त्यातच आहे. पुण्यातील मावळमध्ये बावनकुळे यांच्या हस्ते शिरे-शेटेवाडीतील पुनर्वसन भूखंडाचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, डबल इंजिन सरकार सध्या महाराष्ट्रात काम करत असल्याने राज्याचा विकास हा होणारच आहे.
पण घर कोंबडे आता काहीही बोंबलले तरी आता काही फायदा होणार नाही,
अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता केली.

 

दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सध्या गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट (Swarda Bapat),
माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol), प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade)
यांच्या नावाची चर्चा आहे. तर मुळीक यांच्या अती उत्साही कार्यकर्त्याने त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनर देखील लावले होते.
यावरुन विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Pune Lok Sabha Bypoll Election | no candidate for lok sabha by election in pune say chandrasekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

CNG-PNG Rates Reduces | पुणेकरांना दिलासा! सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजीच्या किंमती 5.70 रुपयांनी स्वस्त

Maharashtra Politics News | ‘या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणात दुहीचं बीज पेरलं’, चंद्रकांत पाटलांचा निशाणा कोणावर?