Pune Lonikand Crime | पुणे : पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand Crime | सासरकडील छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाघोली (Wagholi) परिसरात शुक्रवारी (दि.22) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) गुन्हा दाखल केला. ( Pune Lonikand Crime)

प्रीती संजय शिंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय सखाहरी शिंदे, सासू इंदूमती शिंदे (दोघे रा. ऐश्वर्य लक्ष्मी सोसायटी, वाघोली, नगर रस्ता), नणंद प्रतिभा गणेश माळोदे (रा. आडगाव, नाशिक) यांच्याविरुद्ध आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल करुन पती संजय शिंदे याला अटक केली आहे. प्रीतीचे वडील मोहन विष्णू मते (वय 47, रा. पार्थ रो हाऊस, आडगाव, ता. जि. नाशिक) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती आणि संजय शिंदे यांचा डिसेंबर 2021 मध्ये विवाह झाला होता. संजय हा खासगी कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर दोन-तीन महिन्यांपासुन किरकोळ कारणावरुन तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला टोमणे मारुन शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून प्रितीने राहत्या घराच्या बेड रुममध्ये छताच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळाफास घेऊन आत्महत्या केली.

तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पती संजय शिंदे
याला अटक केली आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”