Pune Metro | …म्हणून शरद पवारांनी मेट्रोतून प्रवास केला; महामेट्रोनं सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज (सोमवारी) पुणे (Pune News) दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) फुगेवाडी स्टेशनला अचानक भेट दिली. त्यानंतर पवार यांनी फुगेवाडी (Phugewadi) ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मार्गावर मट्रोने प्रवास देखील केला. या प्रवासानंतर भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आक्षेप घेत शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे म्हणत टीका केली. आणि मेट्रो प्रशासनाविरोधात (Metro Administration) हक्कभंग प्रस्ताव केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर आता पुणे महामेट्रोने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

 

महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे (Hemant Sonawane) म्हणाले की, ”मेट्रो प्रकल्पाची माहिती हवी म्हणून शरद पवारांकडून (Sharad Pawar)आम्हाला विचारणा करण्यात आली होती. पुणे मेट्रोचे काम सुरू होऊन साडेचार वर्षे झाली, पण, ते आतापर्यंत कधीही आले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना फुगेवाडी येथील मेट्रो स्टेशनच्या कार्यालयात बोलावले. त्यानुसार ते आज या ठिकाणी आले होते. हा प्रकल्प कधी सुरू झाला, खर्च किती, सध्याची स्थिती काय आहे ही सर्व माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर फुगेवाडी स्टेशनची त्यांना माहिती दिली आणि नंतर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. आजच्या भेटीत मेट्रोची ट्रायल रण झाली नाही, शरद पवारांना केवळ मेट्रोबाबत माहिती देण्यात आली. या मार्गावरील मेट्रोची ट्रायल 2019 मध्येच झाली आहे.” (Pune Metro)

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
शरद पवार यांनी मेट्रोतून प्रवास केल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले, ”राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.”

 

Web Title :  Pune Metro | NCP Chief sharad pawar traveled metro mahametro explanation on chandrakant patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा