Pune Crime | पुण्यातील यवतमध्ये गॅस कटरने महाराष्ट्र बँकेचे ATM फोडले, चोरट्यांचा भल्या पहाटे 23 लाखांवर डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत (Yavat Daund taluka) या ठिकाणी एका एटीएमवर दरोडा (Robbery on ATM) टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या (Gas Cutter) सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन (Theft 23 lakh) नेली आहे. ही घटना यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालत (Pune-Solapur Highway) असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या (Bank of Maharashtra) एटीएम सेंटरमध्ये (Pune Crime) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवत गावातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने अलगदपणे एटीएम फोडलं आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख 81 हजार 700 रुपयांची रोकड पळवली आहे. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. (Pune Crime)

ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची (Pune Rural Police) गुन्हे शाखा (Crime Branch) आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी एटीएम कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत (Vikas Jalindar Bhagat) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addi SP Milind Mohite) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar), सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे (API Swapnil Lokhande), पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे (PSI Sanjay Nagargoje) व पोलीस पथकाने पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला (Dog Squad) देखील पाचारण करण्यात आले होते.

Web Title : Pune Crime | 23 lakh robbed from maharashtra bank atm in yavat daund pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी