Pune Minor Girl Rape Case | आई वडिल परगावी गेल्याचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलींवर नातेवाईकाने केला बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | आईवडिल त्यांच्या भरोशावर आपल्या १४ व १० वर्षाच्या मुलींना सोपवून गेले होते. त्यांनीच याचा गैरफायदा घेत दोन्ही मुलींवर बलात्कार (Rape In pune) केला. त्याच्या मित्रानेही १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याप्रकरणी एका समाससेविका महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्‍या कुटुंबातील आईवडिल दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आरोपी हा त्यांच्याकडे रहायला आला. त्याने शनिवारी दुपारी या दोन मुलींवर बलात्कार केला. त्यापूर्वी २० दिवस अगोदरआरोपीने १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. हा प्रकार शेजारी असलेल्या फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Minor girls were raped by a relative taking
advantage of their parents’ departure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा