पुण्यातील मनसेच्या फलकांचे रंग बदलले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय समिकरणे बदलल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या झेंड्याच्या रंगात बदल करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 23 जानेवारीला आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्या आधीच पुण्यातील मनसेच्या फलकांचे रंग बदलण्यात आले आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील ना.सी. फडके चौकातील फलक नेहमीच चर्चेचा विषय असतो. ना.सी फडके चौकातील मनसेच्या फलकाचा रंग बदलण्यात आला असून तो भगवा करण्यात आला आहे.

ना.सी. फडके चौकातील फलक पूर्वी मनसेच्या झेंड्यासहित होता. मात्र, राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याबरोबरच मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाची मोट बांधण्यासाठी पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा आहे. येत्या 23 जानेवारी रोजी होणाऱ्या महाअधिवेशनात याची घोषणा राज ठाकरे करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या आधीच पुण्यातील ना.सी. फडके चौकातील मनसेच्या फलकाचा रंग बदलण्यात आला आहे.

मनसेच्या झेंड्याचा रंग बदलण्यात येणार असल्याने फडके चौकातील फलकाचे देखील तातडीने भगव्या रंगात रुपांतर झाले आहे. या चौकातील फलकाचा रंग भगवा करण्यात आला आहे. याबाबत मनसे प्रभाग अध्यक्ष राकेश क्षीरसागर, शेखर बाळे, अनिकेत गायकवाड, राजू शिर्के यांना विचारले असता, राज ठाकरे साहेबांनी ही जी भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य असल्याने या फलकाचा रंग बदलण्यात आला असल्याचे सांगितेले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/