Pune Monsoon Floods-Disaster Management | पुणे जिल्ह्यातील 84 गावांना पूराचा फटका बसणार ?; आपत्ती व्यवस्थापन सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Monsoon Floods-Disaster Management | हळूहळू उन्हाळ्याचा हंगाम संपताच पावसाळ्याची (Rain) सुरूवात होणार आहे. दरम्यान, पुराच्या (Floods) पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग (Disaster Management Department) सज्ज झालं आहे. हवामान खात्याकडून (IMD) यावर्षी 99 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत 94 टक्के, तसेच, जून ते ऑक्टोबर या काळामध्ये 97 टक्के पाऊस झाला होता. (Pune Monsoon Floods-Disaster Management)

 

यंदाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली आहे. दरम्यान, भीमा नदीच्या (River Bhima) तीरावरील दौंड तालुक्यामध्ये सर्वाधिक 16 गावांना पुराचा धोका आहे. त्यानंतर इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) मावळ, खेड, हवेली तालुक्यातील 10 गावांचा पूरप्रवण म्हणून समावेश होतो. (Pune Monsoon Floods-Disaster Management)

 

नदी तालुका गावांची संख्या –

कऱ्हा बारामती (Karha Baramati) – 1

निरा भोर (Nira Bhor) – 3

मुठा मुळशी, वेल्हा (Mutha Mulshi, Velha) – 9

हवेली, पुणे शहर (Haveli, Pune City)

मुळा मुळशी, पुणे शहर (Mula Mulshi, Pune City) – 7

पवना हवेली, पुणे शहर (Pavana Haveli, Pune City) – 8

भामा खेड (Bhama Khed) – 1

वेळ शिरूर (Vel Shirur) – 1

घोड आंबेगाव, शिरूर (Ghod Ambegaon, Shirur) – 9

निना जुन्नर (Nina Junnar) – 2

भीमा हवेली (Bhima Haveli) – 7

शिरूर (Shirur) – 9

दौंड (Daund) – 16

इंदापूर (Indapur) – 1

इंद्रायणी मावळ, खेड, हवेली (Indrayani Maval, Khed, Haveli) – 10

= एकूण – 84

 

जिल्ह्यात उपलब्ध असलेले साहित्य –

रेस्क्यू बोट (Rescue Boat) -16

इंजिन (Engine) – 16

लाइफ जॅकेट (Life Jacket) – 80

लाइफ बॉय (Life Boy) – 80

दोर (Dor) – 34

जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्ष – हेल्पलाइन क्र. 020-26114949

 

Web Title :- Pune Monsoon Floods-Disaster Management | monsoon 2022 rain floods will hit 84 villages in pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा