Pune MP Girish Bapat Passes Away | खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune MP Girish Bapat Passes Away | पुण्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट यांचे आज (बुधवार) निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये (Deenanath Mangeshkar Hospital & Research Center) दाखल करण्यात आले होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. (Pune MP Girish Bapat Passes Away)

 

 

गेल्या अनेक दिवसांपासुन खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर वेळोवेळी रूग्णालयात आणि त्यानंतर घरी देखील उपचार सुरू होते. पुण्याच्या राजकारणात त्यांना भाऊ असे संबोधले जात होते. खासदार बापट यांची प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस केली होती.

 

 

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या अनेक महिन्यापासून ठीक नव्हती. त्यांना रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ते घरीच आराम करत होते. मात्र, ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मार्गदर्शन देखील केले होते.
मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे.

 

खासदार गिरीश बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल.
सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होतील.

 

Web Title :  Pune BJP MP Girish Bapat passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा