PM Narendra Modi | ‘बेटी बचाव, बेटी पटाव…’, PM मोदी बोलताना एक शब्द चुकले अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रह्मा कुमारींनी (Brahma Kumari) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून भाषणादरम्यान एक मोठी चूक झाली. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी नागरिकांना संबोधित केले. त्यावेळी मोदींनी (PM Narendra Modi) महिला शिक्षणासंदर्भातील (Women’s Education) विषयांबरोबरच महिलांबद्दलच्या वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले. परंतु या संबोधनादरम्यान मोदींनी मुलींसंदर्भातील सरकारी योजनेचं (Government Scheme) नावच चुकवलं. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाओ’ म्हटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CY89iPtLaqf/?utm_source=ig_web_copy_link
पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमामध्ये लोकांना संबोधित करताना एका सरकारी योजनेचं नाव चुकीचं घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यातच घोषणेचा चुकाचा पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. अशातच एका माजी आयएएस (IAS) अधिकाऱ्यानेही पंतप्रधानांना हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत टोला लगावला आहे.
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1484051506932633601?s=20
नेमकं काय घडलं?
मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार करत असलेलं काम आणि सरकारी योजनांबद्दल बोलताना पंतप्रधानांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणेचा संदर्भ द्यायचा होता. मात्र बोलताना ते ‘पढाओ’ शब्द चुकीचा बोलले आणि त्यामुळे घोषणेचा पूर्ण अर्थ बदलला आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बेटी ‘पढाव’ असे म्हणण्या ऐवजी ते ‘पटाओ’ असे बोलले.
टेलिप्रॉम्टरने विश्वासघात केला ?
माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या सूर्य प्रताप सिंह (Surya Pratap Singh IAS) यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत काही दिवसांपूर्वी घडलेल्या टेलिप्रॉम्टर (Teleprompter) प्रकरणाची आठवण करुन दिलीय. ‘बेटी पटाओ?’, आज पुन्हा एकदा टेलिप्रॉम्टरने विश्वासघात केला की काय ? अशा खोचक कॅप्शनसहीत सूर्य प्रताप सिंह यांनी व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे सूर्य प्रताप सिंह हे भाजप विरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात.
Web Title : PM Narendra Modi | beti bachao beti patao modi viral video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का