Pune Municipal Corporation (PMC) | वारजे आणि शिवणे परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणची पाणी पुरवठा व्यवस्था महापालिका ताब्यात घेणार, 18 कोटी रुपये देणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | वारजे (Warje Malwadi) आणि शिवणे (Shivne) परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने (Maharashtra Jeevan Pradhikaran) उभारलेली पाणी पुरवठा (Water Supply Department) व्यवस्था महापालिका Pune Municipal Corporation (PMC) ताब्यात घेणार आहे. यासाठीची यंत्रणा उभारण्यासाठी आलेल्या खर्चाचे सुमारे १८ कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला पुढील आठवड्याभरात देण्यात येणार आहेत. ही यंत्रणा ताब्यात आल्यानंतर वारजे, शिवणे व परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यास आणखी मदत होईल, असा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की महापालिकेच्या जुन्या हद्दीसोबतच समाविष्ट ३४ गावांमधील पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. जुन्या हद्दीमध्ये २४ तास पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने करण्यात येत आहे. यासोबतच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये देखिल २४ तास पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या काही गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने पाणी पुरवठा यंत्रणे मार्फत पाणी पुरवठा करण्यात येत होता. पीएमआरडीएच्या (PMRDA) स्थापनेनंतर व त्याअगोदर काही वर्षांपासून समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून पाण्याची मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पाणी पुरवठ्याची सध्याची यंत्रणाही ताब्यात घेउन ती अधिक अद्ययावत करणे गरजेचे आहे. यापुर्वी फुरसुंगी गावांतील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने उभारलेली यंत्रणा पालिकेने ताब्यात घेतली आहे. तर येत्या आठवड्याभरात वारजे आणि शिवणे येथील पाणी पुरवठा व्यवस्था ताब्यात घेण्यात येणार आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच ३०० मिनी ई बसेस दाखल करण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढविण्यासाठी बसथांबे तसेच बसमध्येही डिजीटल जाहीरातीची संकल्पना राबविण्यात येणार.

रस्ते व पदपथांवर तसेच इमारतींच्या साईड मार्जीनमध्ये अतिक्रमणावरील तसेच बेकायदा फलकांवरील कारवाई कायमस्वरूपी सुरू ठेवणार.

शहरात सार्वजनीक ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ओपन जीम मेन्टेनन्सची कामे केली जाणार.

अभियंता, आरोग्य विभाग व अन्य विभागातील कर्मचारी भरती मे अखेर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.

 

वैद्यकिय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया १०० टक्के पूर्ण

महापालिकेच्या भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (PMC Medical College Pune) व रुग्णालयामध्ये पहिल्या वर्षीसाठीच्या १०० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आहे.
आज स्टाफ तसेच काही विद्यार्थ्यांची भेट घेउन वर्गखोल्या, हॉस्टेल, मेस व अन्य सुविधांबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली.
शिक्षक व विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
सुरवातीच्या काळात महाविद्यालय चालविण्यासाठी महापालिकेच्यावतीने पुर्ण ते सहकार्य करण्यात येणार आहे.
तसेच पुढे जाउन पीपीपी तत्वावर महाविद्यालय चालू ठेवण्याच्या पर्यायाचाही विचार करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Municipal Corporation to take over water supply system of Maharashtra Jeevan Pradhikaran in Warje and Shivne areas will pay Rs 18 crore Vikram Kumar Pune Municipal Commissioner

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा