Pune Municipal Corporation (PMC) | मिळकतकराच्या सेवा पुणेकरांना मिळणार व्हॉट्सॲपवर, एका क्लीकवर 24 तास सेवा उपलब्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेकडून पुणेकरांना मिळकतकराशी (Property Tax) संबंधित सेवांची माहिती मिळावी यासाठी व्हॉट्सॲप सेवा (WhatsApp Service) सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना एका क्लिकवर मिळकतकराची सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. यासाठी महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) वतीने नऊ प्रकारच्या मिळकतकराच्या संबंधित सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. चॅटबोट (Chatbot) द्वारे ही सुविधा पुणेकरांना उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेमुळे नागरिकांना पालिकेत माराव्या लागणाऱ्या चकारांपासून मुक्ती मिळणार आहे.

 

पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) केवळ कर भरण्याची सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिली होती. तर इतर सेवांसाठी मिळकतकर विभाग (Property Tax Department), क्षेत्रीय कार्यालय (Regional Office) तसेच नागरी सुविधा केंद्रात चकरा माराव्या लागत होत्या. या सेवांमध्ये मिळकतकराच्या स्वमुल्यांकणापासून (Self Assessment) ते मिळकतकर थकबाकी नसल्याच्या NOC पर्यंतच्या महत्वाच्या सेवांचा समावेश आहे. आता या सेवा नागरिकांना एका क्लिकवर मिळाव्यात यासाठी 8888251001 हा क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

या सेवांचा लाभ मिळणार…

– देय रक्कम – मिळकतकराची भरलेली रक्कम व देय रक्कम
– कराची पावती – थकबाकी नसेल तर मिळकतकराची पावती काढणे
– एनओसी प्रमाणपत्र – थकबाकी नसेल तर एनओसी प्रमाणपत्र काढणे
– ऑनलाईन पेमेंट – थकबकी असेल तर मिळकतकराचा भराणा ऑनलाईन करता येणार
– वापरकर्ता नोंदणी – वापरकर्ता त्यांचा फोन क्रमांक आणि ई-मेल आयडी प्रॉपर्टी आयडीसोबत लिंक करु शकतात
– फोन क्रमांकवर बिल भरणे – नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिक मिळकतकर आयडी मिळवू शकतात
– कर मोजणी – अंदाजे मिळकतकर मोजणी

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | now income tax services on whatsapp pune residents must have this number

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा