Pune : पत्नीने दिली शिवी, रागात पतीने गळा दाबून केला खून

देहूरोड/पुणे : ऑनलाइन टीम –  किरकोळ कारणावरुन झालेल्या पती-पत्नीच्या भांडणात पत्नीने पतीला शिवी दिली. याचा राग आल्याने पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना देहूरोड(Dehuroad) येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.27) रात्री सातच्या सुमारास गाथा मंदीर रोडवरील साईनगरी वाडाचा मळा, नामदेव निवास येथे घडली. याप्रकरणी देहूरोड(Dehuroad) पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

WTC 2021 फायनलच्या पूर्वी सरावाच्या मॅचमध्ये न्यूझीलँडने दाखवला ‘जोश’, टीम इंडियाला दिला ’इशारा’

पूजा वैभव लामकाने (वय-19) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर वैभव भगवान लामकाने (वय-23) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत पूजाचे वडील सोमनाथ रामदास पाटील (वय-50 रा. बाजार आळी, देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरोना व्हॅक्सीनच्या सप्लायपासून मुलांच्या लसीकरणापर्यंत, केंद्र सरकारने प्रत्येक संभ्रम केला दूर; जाणून घ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा आणि वैभव या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले. भांडणात पूजाने पती वैभवला आई वरुन शिवी दिली. शिवी दिल्याच्या रागातून वैभवने पत्नी पूजाचा गळा दाबून खून केला. अशी फिर्याद मयत पूजाच्या वडिलांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन आरोपी वैभवला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण करीत आहेत.

फॅफ ड्यू प्लेसिस अन् ख्रिस गेल यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय ! जाणून घ्या कोणाचं वाढलं ‘टेन्शन’

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

त्वचा-आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय आहे टोमॅटोचा रस; ‘या’ पध्दतीनं बनवा, मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask