पुण्यातील महम्मदवाडी भागात तरूणाचा खून, मृतदेह दगडाखाली ठेवला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील महंमदवाडी भागात एका मोकळ्या जागेत तरुणाचा खूनकरून मृतदेह दगडात झाकून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महमंदवाडी येथे हेवन पार्क परिसर आहे. त्याच्या पाठीमागील बाजूस दगडात एकाचा मृतदेह लपवून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. मृतदेह काढण्याचे काम सुरू असून, त्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र त्याचा खुनकरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दगडात ठेवल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.