Pune : भारती विद्यापीठच्या हद्दीत गुजरवाडीमध्ये 35 वर्षीय युवकाचा दगड आणि विटाने ठेचून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हेगाराच्या खून आणि अंत्ययात्रेचे प्रकरण गाजलेले असताना पुन्हा कडकडीत लॉकडाऊन सुरू असताना कात्रज परिसरात मध्यरात्री एकाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अद्याप हा खून कोणी आणि का केला हे समजू शकलेले नाही. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

मोहन चवडंकर (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज येथील गुजरवाडीत हा प्रकार घडला आहे. मध्यरात्री 12 च्या सुमारास डोक्यात विटा आणि दगड घालून खून करण्यात आला आहे. रात्री हा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिसांनी धाव घेतली.

त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. सकाळी खून असल्याचे उघडकीस आल्यानंतर तपास पथकाने आरोपीचा माग सुरू केला आहे. संशयित एकाची माहिती मिळाली आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र हा खून का झाला आणि तो कोणी केला हे समजू शकलेले नाही. मोहन हे एका कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे.