Pune : लोहगाव परिसरात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले, मित्रानेच खून केल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लोहगाव परिसरात रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, तिची ओळख पटवत हा खून मित्रानेच केला असल्याचे उघडकीस आणले आहे. खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रुप केला होता.

आरती राठोड (वय 28, रा. सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संतोष राठोड (वय 33) याला अटक केली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी लोहगाव परिसरात डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावर एका निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा चेहरा विद्रुप करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ओळख पटत नव्हती. पोलिसांनी तिचे वर्णन आणि फोटो काढून घेत तपासाला सुरुवात केली. परिसरात माहिती घेत असताना ही महिला आरती असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिची ओळख पटवत या खुनाचा छडा लावला आहे. आरोपी संतोष राठोड हा देखील सोलापूर जिल्ह्यातील आहे. तर दोघेही बिगारी कामगार होते. काही वेळा एकत्र काम करत. त्यांची ओळख झाली होती. ते बोलत असत. दरम्यान ती दुसऱ्यांना देखील बोलत. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले होते. या रागातून संतोष राठोड याने आरती राठोड हिचा खून केला. त्यानंतर ओळख पटू नये यासाठी चेहरादेखील विद्रूप केला होता.
परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक जगताप, उपनिरीक्षक जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.