Pune – Navale Bridge Accident | खासदार सुप्रिया सुळे : अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी: भेट देऊन पाहणी केल्यानंतर खा. सुळे यांची मागणी

नवले पूल परिसरात पुन्हा मोठा अपघात ! चारजणांचा मृत्यू; अनेक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune – Navale Bridge Accident | पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Bengaluru Highway) नवले पुलापासून (Navale Bridge) जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील (Swaminarayan Mandir) पुलाखाली मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने (Maharashtra State Govt) तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा ही आमची मागणी आहे. शासनाने संवेदनशीलता दाखवून याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली. (Pune – Navale Bridge Accident)

 

 

अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पहाटे ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांची विचारपूसही केली. या भागातील अपघातांची मालिका थांबावी यासाठी उपायोजना करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी आपण लवकरच चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहोत. संसदेत देखील हा मुद्दा आपण मांडला असून सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Pune – Navale Bridge Accident)

 

प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पुल परिसरात नोव्हेंबर मध्ये मोठा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा (Pune Police) यांच्यामार्फत काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतू त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

 

घटनास्थळी वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) आणि पुणे पोलीस वेळेत पोहोचले होते,
याबद्दल त्यांचे मी त्यांचे आभार मानते. प्रशासनाने देखील या घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची गरज आहे.
असेही त्या यावेळी म्हणाल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण (NCP Kaka Chavan),
माजी नगरसेवक सचिन दोडके (Sachin Dodke), शरद दबडे (Sharad Dabade), दिपक बेलदरे (Deepak Beldare)
यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune – Navale Bridge Accident | MP Supriya Sule: Maharashtra State government should announce help to accident victims: after visit and inspection MP Supriya Sule’s demand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dagdusheth Ganpati | दगडूशेठ गणपती : श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन