Pune NCP | चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान म्हणजे उच्च दर्जाची मनोरंजन सेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांचा ‘घणाघात’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune NCP | भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा सेन्स ऑफ ह्यूमर अतिशय चांगला असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ, सिलेंडरचे वाढलेले दर आणि अन्नपदार्थांची सातत्याने वाढणारी महागाई यामुळे पोळलेल्या जनतेचे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे. ही अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा (Entertainment service) असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) प्रवक्ते प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांनी लगावला आहे. जी व्यक्ती आपल्या शहरात जमेना म्हणून सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते त्या व्यक्तीला कुणीही सिरियसली घेत नाही असेही ते म्हणाले.

 

चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टिका करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
यांना जमेना म्हणून पवार साहेब मैदानात उतरले असे विधान केले होते. याबाबत बोलताना प्रदिप देशमुख म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचा
(Mahavikas Aghadi) प्रयोग यशस्वी झाला असून कैक प्रयत्नांनंतर देखील आघाडीच्या एकजुटीवर आणि सरकारच्या स्थिरतेवर तसूभरही परिणाम होत नाही.
यामुळे भाजपाच्या नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातून सावरण्यासाठी ते बेताल व बेलगाम वक्तव्याचा आधार घेत आहेत.

 

ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन व इतर कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे.
याचा अर्थ तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जमेना म्हणून मोदी प्रचारात उतरले असा घ्यायचा का?
शरद पवार आमचे सर्वोच्च नेते असून कार्यकर्त्यांशी ते सातत्याने संपर्कात असतात.
जनतेशी पवार यांचे असणारे हे बॉण्डींगच भाजपाच्या पोटात धडकी भरवणारे आहे.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडणार असून चंद्रकांत पाटील व मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Web Title : Pune NCP | Chandrakant Patil’s ‘it’ statement is a high quality entertainment service; NCP spokesperson Pradip Deshmukh in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chitra Wagh | ‘जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय’ (व्हिडीओ)

Devendra Fadnavis | ड्रग्ज प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले – ‘…तर साक्षीदारांची विश्वासहार्यता संपुष्टात येईल’

Pune News | रस्ते, पदपथांच्या कामाने ‘कफ्फलक’ झाली स्मार्ट सिटी कंपनी; एटीएमएसचे‘ 58 कोटी रुपयांचे’ ‘दायित्व’ आता पुणेकरांच्या खिशावर