Pune NCP | RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी PM नरेंद्र मोदींनी ओबीसींना वेठीस धरू नये; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारच्या (Modi Government) नाकर्तेपणामुळे आज आपल्या अठरापगड जातीतील ओबीसी बांधवांच्या हक्काचं आरक्षण (OBC reservation Maharashtra) हिरावले गेले आहे. याचा निषेध करण्यासाठी आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने आंदोलन करण्यात आले. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) आज मोदी सरकारमधील खासदार, पुणेकरांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्या खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा (Empirical data) सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरात अनेक राज्यांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जानेवारी 2014 मध्ये डॉ. मनमोहन सिंह (Dr. Manmohan Singh) यांच्या नेतृत्वात UPA सरकारने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा स्वीकारून ओबीसी आरक्षण अबाधित राखले होते. मात्र मे 2014 मध्ये देशातील जनतेला फसवून नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) सरकार सत्तेत आले आणि इम्पिरिकल डेटा मध्ये दोष आहेत असं कारण देत मोदी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या वाटेत काटे पेरले.

नरेंद्र मोदींच्या या कृतीमागे भाजपची व RSS ची मनुवादी वृत्ती आहे. या देशातील ओबीसी बांधव, दलित बांधव प्रगती करत आहेत ही बाब भाजपच्या मनुवाद्यांना नेहमीच खटकते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचं आरक्षण स्थगित होण्यालाही भाजप (BJP) कारणीभूत आहे. अवधूत वाघ नावाच्या एका व्यक्तीने औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad bench) ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं. हा अवधूत वाघ भारतीय जनता पक्षाचा राज्य सरचिटणीस आहे, राज्य प्रवक्ता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यात भाजपची सत्ता असतानाच भाजपचा पदाधिकारी असलेल्या अवधूत वाघ (avadhut wagh) यांनी ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं हा केवळ योगायोग नाही, हा भाजपने विचारपूर्वक रचलेला कट आहे. असे असतानाही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल ओबीसी बांधवांबाबत खोटा कळवळा दाखवत आंदोलन केले, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (Pune NCP) तीव्र शब्दांत निषेध केला.

 

निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. बापट हे संसदेचे सदस्य आहेत, दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. खासदार बापट यांनी इम्पिरिकल डेटा जाहीर करण्याची मागणी संसदेत करावी, त्यात काय दोष आहेत तेही देशासमोर जाहीर करावे अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. केवळ RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी नरेंद्र मोदींनी आमच्या ओबीसींना वेठीस धरण्याचे काम करू नये असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने देण्यात आला.

 

देशाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यकाळात 1990 साली मंडल अयोग्य स्वीकारून
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते.
त्यानंतर आमच्या ओबीसी बांधवांना जिल्हा परिषद, महानगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळाले, राज्यात ओबीसी नेतृत्व उभं राहिलं.
हीच बाब भाजपच्या मनुवाद्यांनी खटल्यामुळे ओबीसी आरक्षण घालवण्याचा कुटील डाव भाजपने रचला आहे.
याचा जाब येत्या काळात ओबीसींकडून भाजपला नक्कीच विचारला जाईल. असेही प्रशांत जगताप म्हणाले.

 

आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh),
ओबीसी सेल शहराध्यक्ष संतोष नांगरे, मृणालिनी वाणी, गणेश नलावडे, दिपक पोकळे आदिंसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | PM Narendra Modi should not embrace OBCs for implementing RSS’s manipulative agenda; NCP’s pune city president Prashant Jagtap attacks BJP (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना

Chandrakant Patil | ‘2024 मध्ये BJP लोकसभेत 418 जागांच्या खाली येणारच नाही’ – चंद्रकांत पाटील

Udayanraje Bhosale | खा. उदयनराजे भाजपलाही नकोसे?; सातारा जिल्हाध्यक्षांच्या विधानामुळं चर्चेला उधाण