Pune News : लष्कर परिसरात तरूणाला बॅटने मारहाण, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लष्कर परिसरात शिवीगाळ करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून तरूणाला बॅटने मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

शफु उर्फ सरफराज खान व जब्बार इलियास शेख (वय ३४, दोघेही रा. कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इरफान शेख (वय ३८) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास इरफान व त्यांचा भाऊ आणि दोन मित्र येथील स्ट्रीट रस्त्यावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दोघे आरडा-ओरड करीत त्याठिकाणी आले. ते शिवीगाळ देखील करत होते. त्यामुळे इरफान यांनी दोघांना आरडा-ओरड न करण्याचे सांगितले. त्याचा राग त्यांना आला होता. यावेळी जब्बार याने इरफानला तेरे को जादा मस्ती चढी है, अभी जान से मार डालता हू असे म्हणत त्यांच्या डोक्यात बॅटने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याशिवाय परिसरातील लोकांत व लहान मुलांमध्ये दहशत निर्माण केली. अधिक तपास उपनिरीक्षक ए. डी. सोनवणे करत आहेत.