Pune News : तरूणीचे लग्न झाल्यानंतर देखील तिच्याशी फोनवर बोलणार्‍या 23 वर्षीय युवकास 8 जणांकडून बेदम मारहाण, उत्तमनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  तरुणीचे लग्न झाले असताना देखील तिच्यासोबत फोनवर बोलत असल्याने 8 जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली आहे. रात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी इंदिरानगर येथील 23 वर्षीय तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व आरोपी ओळखीचे आहेत. दरम्यान यातील एका आरोपीच्या नातेवाईक असलेल्या तरुणीचे लग्न झाले आहे. परंतु तक्रारदार तरुण त्या तरुणीशी फोन करून बोलत होता. हा प्रकार या तरुणाला समजला. यावेळी त्याने साथीदारांना बोलावून घेतले.

रात्री साडे आकरा वाजता तरुण त्याचे पार्किंगमध्ये उभा होता. यावेळी आरोपी हे दुचाकीवर आले. त्यांनी पार्किंगमध्येच तरुणाला शिवीगाळ करत लाकडी बांबूने बेदम मारहाण करून जखमी केले अधिक तपास उपनिरीक्षक दुधावकर हे करत आहेत.