Pune News | ‘कोरोना’चा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले…(व्हिडीओ)

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Corona Virus) कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यात शनिवार अन् रविवार दुकान बंद (Pune Weekend Lockdown) राहणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. पर्यटकांच्या गर्दीला चाप लावण्यासाठी जिल्ह्यात हा विकेंड लॉकडाऊनचा (Weekend Lockdown) निर्णय घेतला आहे. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी पुणे, रायगड, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर अशा काही जिल्ह्यात अद्याप कोरोनाचे प्रमाण जास्त असल्याचे पवार म्हणाले. Pune News | ajit pawar press conference weekend lockdown and corona virus

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.18) पुण्यातील कोरोना परिस्थितीचा (Pune Corona Virus) आढावा घेतला. जिल्ह्यात शनिवार अन् रविवारी सर्व बंद राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवाना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू राहणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केेले आहे. तसेच विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. तसेच तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याची सांगितले जात आहे. मात्र पालकांनी घाबरु नये. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन (Covacin) लस घेतली आहे. अशा विद्यार्थ्यांनी कोविशिल्ड (Covishield) घेऊ नये असे आवाहनही पवार यांनी केले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक जण लोणावळा, महाबळेश्वर अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी करत आहेत. मात्र नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.

Web Titel :- Pune News | ajit pawar press conference weekend lockdown and corona virus

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित