Pune News – Balbharati | पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News – Balbharati | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (The Maharashtra State Bureau Of Textbook Production And Curriculum Research) इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक (Balbharti Director) कृष्णकुमार पाटील (Krishnakumar Patil) यांनी दिली आहे.

ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत. (Pune News – Balbharati)

पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील उद्बोधन सत्र मंडळाने
https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt या लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून
उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा,
असे आवाहनही पाठ्यपुस्तक मंडळाकडून करण्यात आले आहे.

Web Title :  Pune News – Balbharati | Textbooks available in four parts for class I to VIII students

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS MLA Raju Patil | ‘ही तर भाजप शिंदे गटाची खेळी’, कल्याण लोकसभा जागेच्या वादावरुन मनसेने काढला चिमटा; म्हणाले – ‘ही मंडळी पुन्हा…’

Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

Hruta Durgule | अभिनेत्री ऋता दुर्गुळे पडली होती सहकलाकाराच्या प्रेमात; मुलाखतीमध्ये केले कबुल