Pune News | पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – नायलॉन मांजाच्या (Nylon Cats) वापर, विक्री आणि साठा करण्यास बंदी असताना पुणे शहर (Pune News) आणि परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजा पक्षांसाठी आणि लोकांसाठी प्राणघात ठरत असल्याने पुणे शहरासह (Pune News) राज्यात याच्या विक्रीवर बंदी घातली असताना याची सर्रास विक्री होत आहे. मांजामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी (Biker Injured) झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे.
पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना शुक्रवारी (दि.14) मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. कैलास पवार (Kailash Pawar) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कैलास पवार यांच्या गळ्याला यामध्ये गंभीर दुखापत झाली असून 8 टाके पडले आहेत. एवढेच नाहीतर मांजा बाजूला करताना त्यांच्या हाताची बोटे देखील कापली आहेत. (Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास पवार हे दुचाकीवर भोसरीवरुन (Bhosari) नाशिक फाट्याकडे (Nashik Phata) येत होते. तेव्हा लांडेवाडी येथील चढावरुन दुचाकी येत असताना त्यांच्या गळ्याला काहीतरी चावल्याचा भास त्यांना झाला. त्यांनी गळ्याला हात लावला तर हाताला रक्त लागले. त्यांचा गळा रक्तबंबाळ झाला होता. त्यांनी हाताने मांजा बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर हाताला देखील मांजा कापला.
कैलास पवार हे तातडीने रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करुन गळ्यावरील जखमेला 8 टाके टाकण्यात आले. आज घडलेल्या या घटनेमुळे नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Web Title :- Pune News | biker injured due to nylon manja in pimpri chinchwad on makar sankranti kailash pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update