Pune News : घोषणाबाजीने भाजपातील गटबाजी आली समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापािलकेत हा कार्यक्रम हाेणार असुन, फक्त निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार हाेता. महापािलकेच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. तरीही भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आवारात, इमारतीत दाखल झाले आणि त्यांनी समर्थनार्थ घाेषणाबाजी केली. या घाेषणाबाजीमध्ये बापट यांच्या नावाचा उल्लेख केला जात हाेता, परंतु बापट मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. बापट समर्थकांकडून झालेल्या या घाेषणाबाजीमुळे भाजपमधील गटबाजी जाेर धरू लागल्याची चर्चा रंगली आहे.

भामा आसखेड याेजनेच्या लाेकार्पण कार्यक्रमानिमित्त महापािलकेत आलेल्या नेत्यांच्या समाेरच भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये घाेषणायुद्ध रंगले. तर खासदार गिरीष बापट यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली.

उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेतील विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दाेन्ही नेते महापािलकेत दाखल झाले. दुपारी पावणे चारच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे महापािलकेत दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणा देण्यास सुरवात करून परीसर दणाणून टाकला. त्यानंतर विराेधी पक्षनेते फडणवीस हे दाखल झाले. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाेषणा देण्यास सुरवात केली. हे दाेन्ही नेते महापािलकेच्या मुख्यसभागृहात जात असतानाच दाेन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घाेषणाबाजी सुरूच राहीली.

‘एकच वादा अजित दादा’ या घाेषणेला ‘पुण्याची ताकद गिरीष बापट’ या घाेषणेने उत्तर दिले जाऊ लागले. माेदी ..माेदी या घाेषणेला ‘दादा…दादा’ या घाेषणेने उत्तर िदले जाऊ लागले. जय श्रीराम, जयभवानी जय शिवाजी अशा घाेषणा कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही सभागृहाबाहेर सुरच राहील्या. याचा फटका वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना बसला. त्यांना सभागृहाच्या बाहेर असलेल्या गर्दीमुळे आत वेळेवर जाता आले नाही.