Pune News | डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | मा. नगरसेवक, भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव (Dhananjay Vishnu Jadhav) यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याचे नियुक्तीपत्र डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सचिव जयेश काळे यांनी काढले आहे. आज डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन ऑफ (इंडिया) चे टेक्निकल हेड मार्क भस्मे यांनी नियुक्ती पत्र जाधव यांना दिले. (Pune News)

 

डान्स स्केट या खेळाचा स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (एस जी एफ आय ) च्या खेळांच्या यादीत समावेश झाला असून देशातील सर्व cbsc बोर्डाच्या च्या १९ वर्षा पर्यत च्या शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा या खेळात समावेश असेल.

 

पुढील महिन्या पर्यंत (एस एस सी ) बोर्डाच्या सर्व मराठी शाळा कॉलेज मधील १९ वर्षा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या खेळाचा समावेश होईल. त्यात शहर आणि जिल्ह्यातील सर्व बोर्डाच्या शाळा आणि कॉलेजला सरकारची मान्यता मिळेल. पुढील महिन्यात धनंजय जाधव यांच्या अध्यक्ष ते खाली असोसिएशन च्या वतीने पुणे शहरात जिल्हास्तरीय, cbsc बोर्ड इंटर स्कुल, तसेच सर्वासाठी खुली डान्स स्केट स्पर्धा होणार आहेत. (Pune News)

धनंजय जाधव हे पुणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन अध्यक्ष, द हिंदू फाउंडेशनचे सं. अध्यक्ष असून पुणे जिल्ह्याची मनाची पुणे श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, बॉक्सिंग, पॉवर लिफ्टिंग, क्रिकेट, खोखो स्पर्धा, पेसापालो स्पर्धा आयोजित करतात.

 

२०१९ साली १० देशांचा सहभाग असलेली पेसापालो वर्ल्ड कप स्पर्धा तसेच २०२० साली १२५० खेळाडूंचा सहभाग असलेली, २३ राज्याचा सहभाग असलेली राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पुण्यात आयोजित केली होती.

 

दरवर्षी क्रीडा पुरस्काराचे आयोजन करून विविध क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय,
आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळी वरील खेळाडू, क्रीडा संघटक,
क्रीडा प्रशिक्षक यांना “क्रीडा गौरव पुरस्काराने” सन्मानित करतात.

 

इतर पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांची ही निवड खालील प्रमाणे.
धनंजय विष्णू जाधव अध्यक्ष. मार्क भस्मे चेअरमन. राजेंद्र(बाबू) वागसकर उपाध्यक्ष. विभाकर तेलोरे उपाध्यक्ष.
श्रुती कौशल क्लारेन्स उपाध्यक्ष . विशाल देसाई व्हाइस चेअरमन. संजयमामू कांबळे जनरल सेक्रेटरी.
सचिन शिंदे जॉईंट सेक्रेटरी. रवींद्र साठे खजिनदार. धनंजय मदने सहखजिनदार.
मिलिंद क्षीरसागर टेक्निकल डायरेक्टर. जयंत देशपांडे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर.
असद शेख मीडिया हेड. किरण पाटोळे चिप ॲडव्हायझर. तनवीर शेख सल्लागार.
प्रवीण परुळेकर प्रमुख ऑब्जरवर. शायनी म्हस्के हेड कोरोग्राफर.

 

Web Title :- Pune News | Dhananjay Vishnu Jadhav Pune District President of Dance Skate Sport Association

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prateik Babbar | एका मुलाखतीत प्रतीक बब्बरने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा केला धक्कादायक खुलासा; म्हणाला…

Aai Kuthe Kay Karte | अभिनेते मिलिंद गवळी यांच्या पोस्टने वेधले लक्ष ; “एका जन्मात अनेक जन्म……

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या