Pune News : काय सांगता ! होय, कारच्या धडकेत फिरस्त्या कुत्र्याचा मृत्यू, स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात अज्ञात वाहनांच्या धडकेत नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील आणि त्याबाबत गुन्हे देखील दाखल झाल्याचे आपण वाचले असेलच. पण आज पुणे पोलिसांनी अज्ञात कारच्या धडकेत फिरस्त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता त्या वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात 23 वर्षीय रितम बनसोडे या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 428 नुसार अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हे प्राणी प्रेमी आहेत. ते महर्षीनगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अलंकार मेडिकल समोर भरधाव कार चालकाने एका कुत्र्याला जोराची धडक दिली. यात त्या कुत्र्याचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. रितम व इतर प्राणी प्रेमींनी तात्काळ या कुत्र्याला रुग्णालयात उपचारासाठी केले. पण त्याचा मृत्यू झाला होता. मग त्यांनी कार चालकाचा शोध घेतला. पण तो सापडला नाही. यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी माहिती घेत गुन्हा दाखल केला आहे. येथील सीसीटीव्ही पडताळणी करण्यात आली आहे. त्यात मात्र स्पष्ट असे काही दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पण गुन्हा दाखल करत त्या कार चालकाचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.