Pune News | सर्व्हर स्लो चालत असल्यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास; रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

पुणे : गेल्या काही दिवसापासून नोंदणी विभागाचे सर्व्हर हे अत्यंत सावकाश व संतगतीने चालत आहे यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्वरित सर्व्हरची दुरुस्ती करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अन्यथा दस्त नोंदणी विभागा विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे. (Pune News)

पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की लाखों, करोडो रुपयांचे स्टॅम्प व नोंदणी फी भरून देखील ते चलन डिफेस न झाल्यामुळे नागरिकांना 40 मिनिटात पूर्ण होणारी नोंदणीसाठी तब्बल एक दिवस अथवा दोन दिवसाचा कालावधी जात आहे.आणि हे त्रास दायक आहे. चलनाद्वारे लाखो करोडचा स्टॅम्प भरून देखील ते चलन सिस्टीम स्वीकारण्यासाठी वेळ घेत असेल व नागरिकांचा अमूल्य वेळ वाया घालवत आहेत हे कितपत योग्य आहे. अर्थात पैसे देऊन देखील फक्त मनस्तापला सामोरे जावे लागत आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल. नोंदणीच्या पावतीवर अद्याप दस्त सादर केल्यापासून फक्त 40 मिनिटात स्कॅन होईल अशी वेळ दिले जाते.सध्या स्कॅनिंग बंद या समस्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या वेळेचा आणि त्यांच्या भावनांचा विचार करून त्वरित सर्व्हर ची अडचण दूर करावी असे रोहन सुरवसे पाटील म्हणाले. (Pune News)

Web Title :- Pune News | Due to slow server running, inconvenience to citizens who come for registration; Rohan Suravse Patil warned of agitation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

Ram Setu | रामसेतू खरेच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्री संसदेत म्हणाले…

GST | दुकानदारांसाठी महत्वाची बातमी! 31 डिसेंबरपूर्वी करा हे काम अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

Punit Balan | पुनीत बालन यांची नवीन चित्रपटाची घोषणा; नाव ‘रानटी’, पण ‘रानटी’ कोण हे मात्र गुलदस्त्यात

Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग