Pune News | पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू; 5 ग्रामपंचायती बिनविरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एक ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आलेला नाही. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये (Pune District Gram Panchayat) सरपंच पदांच्या ५५ जागांसाठी २१० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंच आणि सदस्य पदासाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Pune News)

 

जिल्ह्यातील खेड चार, भोर दोन, जुन्नर ३३ आणि आंबेगाव १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या ४८५ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील २४० जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता २४५ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे सदस्यांच्या १६ जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले. (Pune News)

 

ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड थेट मतदारांतून होणार आहे. जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचयातींच्या सरपंच पदांसाठी ३१५ जणांनी अर्ज केला होता.
त्यातील १०३ जणांनी माघार घेतली, तर दोघांचा अर्ज बाद झाला होता. पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
त्यामध्ये खेड आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक, तर जुन्नर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे,
असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Pune News | Election process of 61 gram panchayats of Pune district started; 5 Gram Panchayats unopposed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वारजे माळवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 21 जण ताब्यात

Bad Cholesterol | ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने नसांमध्ये जमणार नाही ‘बॅड कोलेस्ट्रॉल’, आजपासून खायला करा सुरूवात

Irrigation Department | राज्यातील धरणांच्या जलाशयांच्या परिसरात 200 मीटर अंतरात पक्क्या बांधकामांना बंदी – पाटबंधारे विभाग