Pune News | भाऊबीजेनिमित्त 2000 महिलांना गृहपयोगी वस्तूंची भेट; काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांचा अभिनव उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | गेल्या 10 वर्षापासून अंध,वंचित,विधवा व निराधार महिलांसाठी भाऊबीजेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात यंदा दिवाळी भाऊबीजेनिमित्त आज विधवा व निराधार 2000 महिलांना एकत्र करून आगळी वेगळी भाऊबीज साजरी करण्यात आली. पुणे महानगर पालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात संपूर्ण परिसरातील निराधार व विधवा महिला सहभागी झाल्या (Pune News) होत्या.

साडी,धान्याचे किट व दिवाळी फराळ इत्यादी साहित्य या महिलांना भाऊबीज म्हणून दिले शेकडो महिलांनी आबा बागुल (corporator aba bagul) व कार्यकर्त्यांना ओवाळले तसेच सारा परिसर रांगोळ्यानी सजवला होता.
या प्रसंगी सर्व भगिनींवर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.
कोरोना अथवा अन्य परिस्थितीत विधवा झालेल्या अथवा निराधार बनलेल्या भगिनींना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही
त्यांचे जीवन पूर्ववत व्हावे त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण आरोग्य सदैव चांगल्या रीतीने चालू राहावे यासाठी त्यांना
काहीही कमी पडू दिले जाणार नाही असे भावनिक आवाहन याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल (Aba Bagul) यांनी केले.

तुमच्याही PF Account मध्ये चुकीची असेल जन्मतारीख (DOB) तर तर तात्काळ ‘या’ पध्दतीनं करा दुरूस्त, अन्यथा अडकतील सर्व पैसे

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत,मंगलभाई भाटी, भगवान कडू, मधुकर कदम, अप्पा खवळे, ताई कसबे, नंदा ढावरे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल, सागर आरोळे ,इम्त्याज तांबोळी, समीर शिंदे, महेश ढवळे, लक्ष्मण कूतवळ , सुरेश गायकवाड,संतोष पवार, बाबलाल पोळके, संतोष पवार, सौरभ ढेबे, भरत तेलंग, सुरज सोनवणे, राजू देवेंद्र, यांनी अथक परिश्रम (Pune News) घेतले.

दिवाळीमध्ये अशी भाऊबीज मिळाल्यामुळे आमची जगण्याची उमेद वाढली असे अनेक भगिनींनी बोलून दाखवले याप्रसंगी नंदकुमार बानगुडे. यांनी स्वागत केले व रमेश भंडारी यांनी आभार (Pune News) मानले.

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | नवाब मलिकांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खंडणीसाठी ‘आर्यन’चं अपहरण, वानखेडेंशी घनिष्ठ मैत्री असणारे भाजपा नेते मोहित कंबोज मास्टर माईंड’ (व्हिडीओ)

Pandharpur Kartiki Ekadashi Yatra | तब्बल 20 महिन्यांनंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारकर्‍यांनी गजबजणार ! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी

Ahmednagar Hospital Fire |  अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव निष्काळजीपणामुळे; गुन्हा दाखल

Global Air Quality Index | मुंबई जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; जाणून घ्या टॉप 6 शहरांची नावे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Gift of household items to 2000 women on the occasion of diwali; Innovative initiative of PMC Congress group leader Aba Bagul

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update