Pune News | पुणेकरांसाठी गौरवास्पद ! अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : Pune News | अखिल भारतीय महापौर परिषदेच्या (All India Mayor’s Council) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे (Pune News) महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र नुकतेच महापौर मोहोळ यांना परिषदेकडून प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल महापौर मोहोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अखिल भारतीय महापौर परिषद ही राष्ट्रीय स्तराववरील महापौरांची परिषद असून परिषदेचे अध्यक्ष आणि आग्र्याचे महापौर नवीन जैन (agra mayor naveen jain) यांनी महापौर मोहोळ यांची निवड उपाध्यक्षपदी केली आहे. महापौर मोहोळ यांच्या निमित्ताने पुणे शहराला (Pune News) हा बहुमान मिळाला आहे.

या निवडीबद्दल महापौर मोहोळ म्हणाले, ‘आपल्या कामाची आणि पदाला न्याय देण्याची दखल घेतली जाते. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान देणारे आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद म्हणजे केवळ माझाच नाही तर तमाम पुणेकरांचा सन्मान आहे. यामुळे काम करण्याचा उत्साह तरआणखी वाढेलच शिवाय जबाबदारीची जाणीवही आणखी घट्ट होत आहे.’

‘महापौरपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने (BJP) माझ्याकडे दिल्यानंतर पदाला न्याय देण्याचा, झोकून
आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही अशीच वाटचाल सुरु राहील. पुणे
शहराला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासावर याचा कोणताही परिणाम
होऊ दिला नाही. हे शिवधनुष्य आगामी काळातही पेलू. संपूर्ण कारकिर्दीत पुणेकरांची लाभलेली साथ आणि
आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे’.

हे देखील वाचा

SEBI नं गुंतवणुकदारांसाठी 17 मुद्यांव्दारे जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या डिटेल अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Glorious for Punekars! Mayor Murlidhar Mohol as the Vice President of the All India Council of Mayors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update