Pune News : गावठी पिस्तुल बाळगणार्‍यास हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल बाळगणार्‍यास हडपसर पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे असा १ लाख ३४ हजारांचा माल जप्त केला आहे. अजय दिलीप लाळगे ऊर्फ डी (वय २६, रा. भगतसिंग कॉलनी, गोंधळेनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले की पोलीस उपनिरीखक सौरभ माने व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना एक जण लोखंडी पुलाजवळ बुलेट मोटारसायकलवर पिस्तुल घेऊन बसला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून लाळगे याला पकडले. त्याच्याकडील मोटारसायकलसह पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली.

यादरम्यान ही कारवाई करीत असतानाच एक तडीपार गुंड विनित रवींद्र इंगळे (वय २१, रा. राहुल कॉलनी, सातववाडी, हडपसर) हा तेथे आल्या होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असतानाही तो पुणे शहरात आल्याने त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी परिमंडळ ५ चे उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सौरभ माने, हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, समीर पांडुळे, संदीप राठोड, अविनाश गोसावी, नितीन मुंढे, शशिकांत नाळे, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाह, निखील पवार यांच्या पथकाने केली.